मुंबई :
सध्या शिवसेना आणि शिवसैनिक ईडी प्रकरणावरुन आक्रमक होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली होती. याच पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या(ED) कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले असल्याचा प्रकार समोर आला होता. अॅक्शन मोडमध्ये आलेल्या शिवसैनिकांनी हा बेधडक कारनामा केला होता. दरम्यान सध्या याच प्रकरणी व्हायरल होत असलेल्या एका बातमीवरुन थेट संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ईडीविरोधात मंगळवारी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. अनेक मोंठमोठ्या वृत्तपत्रांनी या बातम्या समोर आणल्या आहेत. दरम्यान राऊत यांनी या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
राऊत म्हणाले की, ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर उतरायचे तेव्हा उतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देउ.
कर नाही त्याला डर कशाला ?,
शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच.तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो, असे म्हणत राऊत यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलेले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- राज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल
- आता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा
- आता घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन
- ‘या’ जगप्रसिद्ध कंपनीची भारतात होणार एंट्री; 5 राज्यात मैन्युफैक्चरिंग प्लांटसाठी चर्चा
- ‘करामती बल्ब’ असल्याचे सांगत ठगांनी दिल्लीतील व्यापार्याला 9 लाखाला घातला गंडा; ‘असा’ घडला प्रकार