मुंबई :
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्हीही पक्ष फक्त एकाच विषयावर एकत्र येऊ शकतात, असे म्हटले जयचे. तो विषय म्हणजे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे. जेव्हा जेव्हा बाळसाहेब ठाकरेंशी निगडीत विषय येतो या दोन्ही पक्षांची भूमिका एकमेकांशी पुरेपूर साधर्म्य साधणारी असते. मात्र आता पहिल्यांदाच या मुद्यावरून शिवसेना आणि मनसे यांच्यात वाद पेटला आहे.
नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारण केले असल्याची टीका मनसेने केली आहे. या विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु मनसेने मात्र याला तीव्र विरोध केला आहे.
नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभे राहत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेने पत्रकार परिषद घेत केली आहे. रायगड आणि नवी मुंबई मनसेकडून ही मागणी करण्यात आली आहे.
मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी ‘लोकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे’, अशी मागणी केली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट