मुंबई :
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरीची एक मोठी संधी पदवीधर तरुणांना चालून आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रालय विभाग आणि अन्य संस्थांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या एकूण ६,५०६ पदांवर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
कर्मचारी भरती आयोगाच्या (Staff Selection Commission) CGL च्या विविध भरती परीक्षांच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आपली वेबसाईट ssc.nic.in वर यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. फॉर्म भरण्याआधी अर्जदारांनी पात्रतेच्या अटी चेक करा. अर्ज नियमांमध्ये बसत नसल्यास पात्रता रद्द होईल.
असा भरा अर्ज :-
- सर्चबॉक्समध्ये SSC टाईप करून कमिशनच्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.
- होम पेजवर अप्लाय या पर्यायावर क्लिक करा.
- CGL ची निवड करा आणि ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
- या लिंकवर गरजेची असलेली माहिती भरा आणि तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.
- एप्लिकेशन सबमिट करा आणि ऍप्लिकेशन फी भरा.
या तारख्या घ्या लक्षात :-
- 31 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
- 2 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन फी भरता येईल
- ऑफलाईन चलान 4 फेब्रुवारीपर्यंत जनरेट करता येणार असून याची रक्कम 6 फेब्रुवारी 2021 पर्यंत देता येईल.
- टायर-1 परीक्षा 29 मे 2021 ते 7 जून 2021 पर्यंत होणार आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने