अंबानीपासून ते अदानीपर्यंत ‘या’ 7 अब्जाधीशांनी कोरोना कालावधीत कमावलेत तब्बल ‘एवढे’ कोटी रुपये; इतर 5 नावे वाचून व्हाल शॉक

कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आली होती परंतु भारतीय अब्जाधीशांच्या कमाईवर त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट या अब्जाधीशांची संपत्ती पूर्वीच्या तुलनेत बरीच वाढली आहे. यावर्षी 7 भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 64 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

Bloomberg Billionaire निर्देशांकानुसार या 7 अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती सुमारे 200 अब्ज डॉलर्स आहे. 1 अब्ज डॉलर्सची किंमत 7,364 कोटी रुपये आहे.

  1. गौतम अडानी :- अदानी समूहाच्या व्यवसायात रिन्यूएबल एनर्जी, बंदरे, टर्मिनल आणि लॉजिस्टिकचा समावेश आहे. यावर्षी गौतम अदानीच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत अदानीची संपत्ती 21.1 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. गेल्या वर्षअखेरच्या काळात त्यांची संपत्ती 32.4 अब्ज डॉलर्स होती, जी 11.3 अब्ज डॉलर्स होती.
  2. मुकेश अंबानी :- भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती आतापर्यंत 18.1 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांच्याकडे 58.6 अब्ज डॉलर्सची संपत्ती होती, ती आता वाढून 76.7 अब्ज डॉलर्स झाली आहे. अंबानीची कंपनी तेल आणि गॅस, दूरसंचार आणि किरकोळ क्षेत्रात कार्यरत आहे. अंबांनींच्या कमाईत रिलायन्स इंडस्ट्रीजची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
  3. साइरस पूनावाला :- सायरस पूनावाला भारतीय वैक्सीन(लस) किंग म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातील त्यांची कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 6.91 अब्ज डॉलर्सने वाढून 15.6 अब्ज डॉलरवर पोचली आहे.
  4. शिव नाडर :- एचसीएल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख शिव नादर यांची संपत्ती यावर्षी 6.23 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. आता त्याची संपत्ती 22 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. एचसीएल टेक हे भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे आयटी एक्सपोर्टर आहेत.
  5. अजीम प्रेमजी :- विप्रो आयटी कंपनीच्या अजीम प्रेमजीची संपत्ती यावर्षी 5.26 अब्ज डॉलर्सने वाढून 23.6 अब्ज डॉलरवर गेली आहे.
  6. राधाकिशन दमानी :- प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि डी-मार्टचे मालक राधाकिशन दमानी यांची संपत्ती यावर्षी  4.71 अब्ज डॉलरने वाढून 14.4 अब्ज डॉलरवर गेली आहे.
  7. दिलीप सांघवी :- दिलीप शांघवी हे सन फार्मा या दिग्गज कंपनीचे मालक आहेत. यावर्षी त्यांची संपत्ती 2.23 अब्ज डॉलर्सने वाढून 9.69 अब्ज डॉलरवर पोचली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here