टाटाच्या ‘त्या’ इलेक्ट्रिक कारचा जलवा; एकदा चार्ज केल्यावर जाणार तब्बल 200 किलोमीटर, किंमतही असू शकते आवाक्यात

मुंबई :

प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी लोकांचा ओढा इलेक्ट्रिक गाड्यांकडे असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आले आहे. सध्या शहरसह ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय कंपनी टाटा एक अशी इलेक्ट्रिक कार लॉंच करणार आहे. जी एकदा चार्ज केल्यावर तब्बल 200 किलोमीटर चालते.

दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक मोठ्या कंपन्या उतरत आहेत. विविध नवनवीन संशोधन घेऊन ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी कंपन्यांची स्पर्धा लागलेली आहे. अशातच टाटाने आपली नॅनो कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याचे ठरवले आहे. तीन वर्षापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाटा मोटर्सने Jayem Automotives सोबत पार्टनरशीप केली होती. त्यावेळी टाटा नॅनोच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला लाँच करण्याची घोषणा करण्यात आली होती. 

अनेक वर्षापासून या कारच्या प्रोडक्शन आणि तयारी संबंधी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता रशलेन मध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टमध्ये या इलेक्ट्रिक कारला टेस्टिंग दरम्यान पुण्यात स्पॉट करण्यात आले आहे.

दरम्यान या गाडीविषयी कंपनीने अद्यापही अधिकृत माहिती दिलेली नाही. नवीन रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, टाटा नॅनो इलेक्ट्रिक मध्ये 17.7 kW च्या क्षमतेचे ४८ वोल्टचे इलेक्ट्रिक मोटरचा प्रयोग करण्यात आला आहे. या मोटरला इलेक्ट्रा ईव्ही द्वारा सप्लाय करण्यात आला आहे. याला कंपनी टिएगो आणि टिगोर साठी इलेक्ट्रिक सप्लाय केला होता.

दरम्यान या कारची किंमतही सामान्य माणसांच्या आवाक्यातील असेल, असे सांगितले जात आहे. मात्र नेमकी किंमत काय असेलयाविषयी अद्याप कंपनीकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.     

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here