धक्कादायक : थंडीत किती दिवस बसवणार, असा प्रश्न करीत शेतकऱ्याने केली आत्महत्या..!

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध सुरू आहे. दरम्यान, दिल्ली सीमेवरील आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आलेली आहे.

मृत शेतकरी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरयेथील रहिवासी आहेत. त्याने एक सुसाईड नोटही ठेवली आहे. रामपूर जिल्ह्यातील सरदार केसिंग लादी यांनी आज यूपी गेट येथील शौचालयात आत्महत्या केली ही अतिशय दुःखाची बाब आहे, असे भारतीय किसान युनियनने म्हटले आहे.

सुसाईड नोट आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांनी आपल्या आत्महत्येला जबाबदार सरकार असल्याचे चिठ्ठीत सांगितले आहे. हिवाळ्याच्या थंडीत आपण इथे किती वेळ बसणार आहोत, असेही त्या चिठ्ठीत म्हटलेले असल्याचे एनडीटीव्ही इंडिया यांनी बातमीत म्हटले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here