श्रीमंतांची यादी झाली अपडेट; पहा अंबानींचे स्थान कुठे आणि पहिल्या दहात कोण आहेत ते

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी यावर्षी रिलायंस जिओ आणि रिलायंस रिटेल वेंचर्सची भागीदारी विकून 1.9 लाख कोटी रुपये जमा केले. यामुळे अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या नंबरवर आले होते. परंतू, मागील अनेक दिवसांपासून रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये होत असल्या कपातीमुळे सध्या 76.9 बिलियन डॉलरसह अंबानी 12व्या स्थानी आहेत.

आशियातील टॉप-5 श्रीमंतांपैकी चारजण चीनमधील आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर झांग शानशान आणि मुकेश अंबानी आहेत. तिसऱ्या नंबरवर कोलिन हुआंग आहेत. टेंसेंटचे फाउंडर आणि चेअरमन पोनी मा चौथ्या नंबरवर आहेत. यानंतर पाचव्या नंबरवर अलीबाबाचे चेअरमन आणि फाउंडर जॅक मा आहेत. 

जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती

रँकनावनेटवर्थ (बिलियन डॉलर्समध्ये)
1जेफ बेजोस192
2एलन मस्क167
3बिल गेट्स131
4बर्नार्ड अर्नॉल्ट115
5मार्क जकरबर्ग103
6वॉरेन बफे87.0
7लॅरी पेज81.9
8स्टीव बिल्मर80.2
9सर्जे ब्रिन79.3
10लॅरी एलिसन79.2

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here