या योजनेचे नाव आहे पीएम-एसवायएम म्हणजेच पंतप्रधान श्रम योगी महाधन योजना. सदर योजनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून ही योजना कामगारांसाठी सुरू केली होती. या पेन्शन योजनेत आजपर्यंत देशातील ४२,७४,९९२ लोकांनी नोंदणी केली आणि सामील झाले आहेत. जर आपले मासिक उत्पन्न 15 हजारापेक्षा कमी असेल तर आपणही या योजनेचा फायदा घेऊ शकता. ही योजना १८ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांसाठी बनविली आहे. या योजनेत ६० वर्षांनंतर ३००० रुपयांपर्यंत पेन्शन देण्यात येईल.
या पेन्शन योजनेत राज्यनिहाय कामगार संख्या :
1) हरियाणा :- 7,35,205
2) उत्तर प्रदेश :- 5,93,450
3) महाराष्ट्र :- 5,80,995
4)गुजरात :- 3,66,766
अशा प्रकारे उघड खाते :-
1) घराजवळील कॉमन सर्व्हिस सेंटर भेट देऊन योजनेची माहिती द्या. 2) तसे शक्य नसल्यास जिल्हा कामगार कार्यालय, ईपीएफ, एलआयसी कार्यालय आणि ईएसआयसी कार्यालयातूनही उघडता येईल.
या दोनच आहेत अटी :-
1) खातेदाराचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
2) हे खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा १८ वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंत आहे.
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने