जास्त मीठ खाणे हे आपल्या अनेक आजारांना बळी पडू शकते. हे आजार थेट मृत्यूशी सबंधित आहेत. साधारणपणे कुठल्याही व्यक्तीच्या शरीराला दररोज 5 ग्रॅम मिठाचीच गरज असते. मात्र एका संशोधनात पुढे आले आहे की, आपण 10 ग्रॅमपेक्षाही जास्त मिठाचं सेवन करतो. जे आपल्या आरोग्यावर निश्चित परिणामकारक ठरते. प्रमाणापेक्षा जास्त मीठ शरीरात गेल्यास त्याचे दुष्परिणाम होतात.
जाणून घ्या दुष्परिणाम :-
१) मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास स्ट्रोक होतो
२) कोरोनरी हार्ट डिसीजची शक्यता वाढते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये प्लाक जमा होऊन नसा आकुंचित पावतात आणि हृदयाला कमी रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
३) मिठाच्या अतिसेवनामुळे ही समस्या बळावू शकते. शरीरात मीठ जास्त झाल्यास त्याचा ब्लड प्रेशरवरही परिणाम होतो आणि हृदयावर परिणाम होण्याचा धोका वाढतो.
४) जास्त मीठ खाल्ल्याने पोटाचा कॅन्सरही होऊ शकतो. मिठात हेलिकोबॅक्टर पिलोरी बॅक्टेरिया असतात जे पोटात सूजेला कारणीभूत ठरतात.
५) शरीरात सोडियमचं अधिक प्रमाण हेच किडनी खराब होण्याचं कारण आहे. मीठ जास्त खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो कारण मिठात सोडियम भरपूर असतं.
६) शरीरात मीठ जास्त झाल्यास हाडांचं कॅल्शिअम कमी होतं आणि मिठाचं अधिक सेवन हाडं कमजोर बनवतं.
संपादन : संचिता कदम
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस
- राज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल
- आता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा
- आता घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन