वाढदिवस विशेष: नाना पाटेकर आहेत ‘एवढ्या’ संपत्तीचे धनी; वाचून बसेल धक्का, तरीही राहतात एवढे साधे

हिन्दी इंडस्ट्रीलाही आपल्या अभिनयाने भुरळ घालत आपले अस्तित्व सिद्ध करणारा अवलिया अभिनेता म्हणजे नाना पाटेकर. आपल्या कमाईतील 90% हिस्सा समाजासाठी खर्च करणारे समाजसेवक नाना पाटेकर. नाना पाटेकर हे नाव माहिती नसेल, असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही.

नोकर, ड्रायव्हर आणि इतर हलकी कामे करणारी मराठी अभिनेत्यांच्या वाट्याला येत असताना नाना पाटेकर यांनी बॉलीवूडमध्ये उंचच उंच भरारी घेतली.  नाना फिल्म इंडस्ट्रीमध्ये 4 दशकापासून काम करत आहेत. तसेच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठे काम उभा केले आहे. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘गमन’ होते.

1978मध्ये हा चित्रपट लोकांच्या समोर आला. आपल्या कमाईतील 90% हिस्सा दान करूनही नाना पाटेकर आजही ७२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊसही आहे. याशिवाय नाना यांच्याकडे ८१ लाख रुपयांची ऑडी-Q7 कार आहे. तसंच १० लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि दीड लाख रु. किंमतीची रॉयल इनफिल्ड क्लासिक-३५० आहे.

पैसा,स्टारडम कॉनटॅक्ट एवढे सगळे असूनही नाना आजही एकदम साधे राहतात. आज आम्ही आपल्याला त्यांच्या साध्या राहणीमानाचे कारण सांगणार आहोत. नाना आवड म्हणून नाही तर परिस्थितीमुळे अभिनय क्षेत्रात आले. याच कारणामुळे ते आज साधारण आयुष्य जगतात. 

संपादन : स्वप्नील पवार     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here