भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांचा थरार हा नेहमीच जबरदस्त रंगतो. 80-90 च्या दशकात तर भारत पाक मॅच असल्यावर रस्ते रिकामे असायचे, जो देश हरला त्या देशातील लोक रागात टीव्ही फोडायचे. गावस्कर-इम्रान समोरासमोर असो किंवा गांगुली-शोएब किंवा सचिन-अक्रम. वर्षानुवर्षे लोकांनी या मॅचचा खूप आनंद लुटला आहे. कदाचित हेच कारण आहे की भारत-पाक सामन्यात घडलेली प्रत्येक कथा स्मरणीय होती. पण आज आम्ही असा किस्सा सांगणार आहोत, ज्याविषयी क्रिकेटच्या खास चाहत्यांनाही माहिती नसेल.
अशीच एक भारत -पाक मॅच होती. क्रिश श्रीकांत बॅटिंग करत होता आणि इम्रान खान(आताचे पाकिस्तानचे पंतप्रधान) बॉलिंग करत होता. एक बॉल असा पडला की श्रीकांतच्या पॅडला चेंडू लागला. इमरानने जोरदार अपील केली आणि अंपायरने आऊट आहे, असे दाखवण्यासाठी बोट उंचावले. पंच बोट उंचावत असताना श्रीकांत त्याच्या बॅटने ‘मी आऊट नाहीये’ असे खुणावत होता. श्रीकांतने अंपायरला स्पष्ट पुन्हा एकदा खुणावले की ‘मी आऊट नाहीये’. मात्र सुटलेला हरवलेला बाण आणि पंचांची उठलेली बोट कधीच थांबत नाही! इथेही असेच काही घडले आणि या निर्णयामुळे श्रीकांत खूप निराश झाला.
मात्र सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट तर त्यानंतर घडली. आता श्रीकांत अत्यंत निराशाजनक होता आणि इम्रानने मोठेपणा दाखवला आणि पंचांशी बोलून इमरानने श्रीकांतला पुन्हा बोलवले. क्रिकेटच्या इतिहासात कदाचित ही प्रथमच वेळ होती जेव्हा कोणत्याही विरोधी संघातील खेळाडूने मैदानातून बाहेर पडलेल्या फलंदाजाला परत बोलावले होते. श्रीकांत पुन्हा एकदा क्रीजवर आला होता. पुन्हा त्याने खेळण्यासाठी मोठा श्वास घेतला. पण पुढच्या बॉलवर जे घडले ते अधिक धक्कादायक होते.
पुन्हा इमरानच्या पुढच्याच बॉलवर विकेटकीपरला कैच देत श्रीकांत आऊट झाला. मात्र यावेळी ग्राऊंडमधून बाहेर पडताना त्यांच्या चहर्यावर हसू होते. हे जगातील क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडत होते.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने