भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्हीला क्रॅश टेस्टमध्ये मिळालेत ‘एवढे’ स्टार; वाचून व्हाल आश्चर्यचकित

मुंबई :

ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली. आता ऑटो क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे.

Nissan India ने सब ४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइट भारतात काही महिन्यांपूर्वी  लाँच केली होती. या कारला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.  आता या कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. जे की खूपच चांगले रेटिंग आहे. आधीच मार्केटमध्ये धमाका केलेल्या मॅग्नाइट या कारला मिळालेल्या रेटिंगमुळे लोक अधिकच आकर्षित होऊ लागले आहेत.

दरम्यान आता गाडीच्या किमतीत 55 हजारांनी वाढ झाल्याचे समजत आहे. आता ही कार मिळवायची असेल तर ८ महिने वाट पाहावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे सध्या या कारच्या  ५ हजारांहून जास्त बुकिंग्स झालेल्या आहेत.

अशा आहेत या कारच्या सर्व व्हेरियंटच्या किमती :-

1. Magnite XE ₹ 4.99 लाख
2. Magnite XL ₹ 5.99 लाख
3. Magnite XV ₹ 6.68 लाख
4. Magnite XV Premium ₹ 7.55 लाख
5. Magnite Turbo XL ₹ 6.99 लाख
6. Magnite Turbo XV ₹ 7.68 लाख
7. Magnite Turbo XV Premium ₹ 8.45 लाख
8. Magnite Turbo XL CVT ₹ 7.89 लाख
9. Magnite Turbo XV CVT ₹ 8.58 लाख
10. Magnite Turbo XV Premium CVT ₹ 9.35 लाख

संपादन : स्वप्नील पवार    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here