डिसेंबर तिमाहीत गुंतवणूकदार मालामाल: शेअर बाजारातून मिळवले 33 लाख कोटी रुपये, ‘हे’ काही मोजके शेअर्स बनले रिटर्न किंग

मुंबई :

आर्थिक वर्ष 2021 मधील डिसेंबर तिमाही गुंतवणूकदारांसाठी उत्कृष्ट ठरली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या काळात सेन्सेक्सने 23 टक्क्यांहून अधिक मजबूत परतावा दिला.

हा तिमाही परतावा बर्‍याच वर्षांत अव्वल स्थानी आहे. या तीन महिन्यांत केवळ लार्जकॅपच नव्हे तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सनीही गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. असे बरेच शेअर्स आहेत ज्यांनी 3 महिन्यांत पैसे दुप्पट केले आहेत. डिसेंबर तिमाहीत शेअर बाजाराची कामगिरी जाणून घेवूयात.

सेन्सेक्सने डिसेंबर तिमाहीत सुमारे 23 टक्के परतावा दिला आहे. तर निफ्टीने या 3 महिन्यांत 22 टक्के परतावा दिला. सप्टेंबर 2020 अखेर बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 1,55,24,267.37 कोटी रुपये होती. तर 31 डिसेंबर रोजी ती 1,88,03,518.60 कोटी रुपयांवर पोचली.

3 महिन्यात या शेअर्सने केली कमाई :-

बीएसई 500: तानला प्लॅटफॉर्ममध्ये 138% रिटर्न, सुझलॉन एनर्जी मध्ये 131% रिटर्न, वक्रांगी मध्ये 127% रिटर्न, सेल मध्ये 122%,  IFB इंडस्ट्रीत 100% रिटर्न आहे. अदानी गॅसमध्ये 99%, स्पाइस जेटमध्ये 97%, हिंदुस्तान कॉपरमध्ये 87%, वोकार्ट लिमिटेडमध्ये 87% आणि शोभा लिमिटेडमध्ये 84%.

बीएसई  100:  टाटा स्टीलमध्ये 78%, श्रीराम ट्रान्सपोर्टमध्ये 72 %, इंडसइंड बँकेत 71 %, बजाज फायनान्समध्ये 62 %, कोटक महिंद्रामध्ये 58% आणि एसबीआयमधील 50 %.

डीएलएफ आणि बजाज फिनसर्व्हर यांनाही 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला. आयसीआयसीआय बँकेत 49 टक्के आणि एचडीएफसीला 48 टक्के.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here