मोठी बातमी… बॅनर्जींच्या ‘या’ जवळच्या व्यक्तीच्या घरावर सीबीआयचा छापा; ‘असे’ आहे प्रकरण

कोलकाता :

दिवसेंदिवस राजकीय नेत्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात ईडी जोरात आहे तर इतर ठिकाणी सीबीआय धमाका करत आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार समोर येताना दिसत आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे,  तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळचे समजले जाणारे कोलकातामधील तृणमूल यूथ काँग्रेसचे सचिव विनय मिश्रा यांच्या घरावर आज सीबीआयने  छापा घातला. काही दिवसांपासून तेथील निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बॅनर्जी हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. गुरुवारी सीबीआयची टीम कोलकाता येथील विनय मिश्रा यांच्या ठिकाणांवर पोहोचली. दोन ठिकाणी पशूधन घोटाळा आणि एका ठिकाणी कोळसा चोरी प्रकरणी छापे टाकण्यात आले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here