मोठी बातमी : ‘त्या’ एका कारणामुळे सरकारने घेतला तो निर्णय; देशातील वाहनचालकांना दिलासा

दिल्ली :

केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतू मुक्तता व्हावी यासाठी चारचाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केलं होतं. परंतु वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील चारचाकी वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

प्रत्येक चारचाकी वाहनाला 15 फेब्रुवारी 2021 पासून FASTag अनिवार्य असणार आहे. FASTag ची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नसल्यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील. टोलचे पैसे फास्टॅग अकाउंटमधून वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल.

फास्टॅग म्हणजे काय आणि त्याचा कसा होतो फायदा :-

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता.

संपादन : स्वप्नील पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here