आज देशातील लहान मुलांना सुद्धा जिओ, रिलायन्स आणि धिरूभाई अंबानी ही नवे माहिती आहेत. धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची पायाभरणी केली. असे म्हटले जाते की, त्यांच्यासारखा उद्योजक आजपर्यंत भारतात झाला नव्हता. त्यांनी नेहमीच दूरचा विचार केला आणि त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ते यशस्वी उद्योजक बनले. त्यांच्याबद्दल आजवर तुम्ही बर्याच गोष्टी आणि कथा ऐकल्या असतीलच. आज आम्ही तुम्हाला धीरूभाई अंबानीशी संबंधित असे एक किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा प्रसिद्ध वस्त्रोद्योग क्षेत्रातील ब्रॅंड ‘विमल’ च्या सुरुवातीचा आहे.
धीरूभाई अंबानी जेव्हा येमेनहून भारतात आले तेव्हा त्यांनी देशातील व्यापाराचे बारकाईने संशोधन केले. त्यांना असे आढळले की, देशात पॉलिस्टर फॅब्रिकला मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी 1996 मध्ये टेक्सटाइल कंपनी सुरू केली.
अहमदाबादच्या नरोदामध्ये त्यांनी विमल सूटिंग शिर्टिंग नावाची ही कंपनी स्थापन केली होती. ते दर आठवड्याच्या शेवटी मुंबईहून अहमदाबादला त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत असत. येथे ते कंपनी आणि कर्मचार्यांच्या सर्व समस्या ऐकत आणि त्यांचे निराकरण करत.
मशीन्स बसविण्यात आल्या, कपड्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात केले गेले. परंतु इतर कापड कंपनीच्या मालकांनी अजून एक नवीन व्यापारी मार्केटमध्ये येऊ नये म्हणून एक आयडिया केली. आणि मोठा प्लान आखला. त्यांनी आपल्या सर्व वितरकांना (किरकोळ विक्रेत्यांना) सांगितले की जर त्याने धीरूभाईंकडून वस्तू विकत घेतल्या तर आम्ही तुम्हाला माल देणार नाहीत.
परंतु कापड गिरण्यांच्या मालकांनी केलेली हे कारस्थान धीरूभाईंना रोखू शकले नाही. धीरूभाई देशभर फिरले आणि वितरकांना आश्वासन दिले की, जर काही नुकसान झाले असेल तर माझ्याकडे या आणि नफा झाला तर तुमच्याकडे ठेवा. त्याच वेळी त्यांनी काही नवीन कापड व्यापारी देखील उभा केले.
धीरूभाईंची ही गोष्ट घाऊक व्यापर्यांना आवडली आणि त्यांनी त्यांच्याकडून जोरदार कापड खरेदी केले. पॉलिस्टरची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने बाजारात विमल कापडाची मागणी वेगाने वाढू लागली. एकच दिवस आला जेव्हा एकाच दिवसात देशभरात विमलच्या 100 शोरूमचे उद्घाटन झाले.
त्या काळात विमल हा नंबर एक पॉलिस्टर ब्रँड होता. या क्षेत्रात यश मिळाल्यानंतरच धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची पायाभरणी केली.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी