कोरोना काळात अजून एक संकटाची शक्यता; ‘या’ राज्यात घडलाय मोठा धक्कादायक प्रकार

झालावाड़ :

कोरोना संकट अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये, अशातच झालावाडमध्ये एक नवीन धोका निर्माण होऊ लागला आहे. राजस्थान मधील झालावाड मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राडीच्या बालाजी भागात 50 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनानेही याची पुष्टी केली आहे.

इतक्या कावळ्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे जिल्हा प्रशासन आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सदर घटना घडलेल्या भागात  प्रशासनाने 1 किलोमीटर क्षेत्रात कर्फ्यू लागू केला आहे. तसेच एक रैपिड रिस्पांस टीम देखील तयार केली आहे.

सध्या जिल्हा प्रशासन मोठ्या संख्येने झालेल्या कावळ्याच्या मृत्यूमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. एकत्रितपणे किती कावळ्यांचा मृत्यू झाला याचा शोध घेण्याचा प्रशासन प्रयत्न करीत आहे. मिळलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रशासनाने त्याला बर्ड फ्लू म्हटले आहे. येथे रॅपिड रिस्पॉन्स टीमने नमुन्याची चाचणी सुरू केली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित भागातील पोल्ट्री फार्म व पोल्ट्री शॉपमधूनही नमुने घेण्यात आले आहेत.

पशुवैद्यकीय तज्ञांनीही या घटनेस गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे. पशुवैद्य म्हणतात की हा विषाणू हा एक आजार आहे जो पक्ष्यापासून मनुष्यापर्यंत पसरतो. हा रोग मानवांमध्ये पसरू शकतो. डॉ. लक्ष्मण राव म्हणतात की 2017 मध्ये भारत या आजारापासून मुक्त झाला होता, परंतु अचानक झालावाडमध्ये घडलेल्या घटनेने चिंता वाढली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here