शपथविधीनंतर पहिल्यांदाच, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर पुन्हा अजित पवार- देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर

पुणे :

महाराष्ट्राचे राजकारण जनतेला कळावे एवढे सहज सोपे नव्हते आणि आता तर त्याहूनही नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी पहाटेचा शपथविधी इतका गाजला की तो महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. या शपथविधीचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एकाच मंचावर दिसणार आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार,  पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त नववर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. त्या कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली होती. आता पुणेकरांना यानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय टोलेबाजी पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवशेनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.

संपादन : स्वप्नील पवार     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here