बाब्बो, शेतकऱ्याची कमाल; म्हणून त्याने जमीन केली कुत्र्याच्याचा नावावर..!

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मनोरंजन या बॉलिवूड चित्रपटाची कथा प्रत्यक्ष आयुष्यात घडली. अक्षय कुमारच्या फिल्म एंटरटेन्मेंटमध्ये एक व्यावसायिक आपल्या मालमत्तेला आपल्या विश्वासू कुत्र्याच्या नावावर करून टाकतो. छिंदवाडाच्या गावातील शेतकऱ्यानेही आपल्या निम्म्या मालमत्तेला कुत्र्याच्या नावावर करून टाकले आहे. शेतकऱ्याच्या कुत्र्याचं नाव जॅकी आहे.

आपल्या मुलाच्या वागणुकीमुळे नाखूष असलेल्या शेतकऱ्याने इच्छापत्र केले आहे. त्यात लिहिले आहे, की कुत्रा सतत त्याची काळजी घेतो. त्यामुळे जो जॅकीची काळजी घेईल त्याला त्याच्या मालमत्तेचा हिस्सा मिळेल. छिंदवाडाच्या चारई ब्लॉकच्या बारी गावात राहणारे ५० वर्षीय शेतकरी ओम वर्मा यांनी ही किमया केली आहे.

ओम वर्मा यांनी दोन विवाह केले आहेत. पहिल्या लग्नापासून तीन मुली आणि एक मुलगा आहे. दुस-या लग्नाच्या दोन मुली आहेत. ओम वर्मा यांनी निम्म्या मालमत्तेचे हक्क दुसरी पत्नीच्या नावावर करण्याचे म्हटले आहे. तर, दुसरा अर्धा भाग आपल्या विश्वासू कुत्र्याच्या नावावर..!

शेतकऱ्याने आपल्या इच्छेनुसार स्पष्टपणे लिहिले आहे की त्याची सेवा दुसरी पत्नी चंदपा वर्मा आणि कुत्रा जॅकी हेच करीत आहेत. शेतकऱ्याने म्हटले आहे की, या दोघांवरही त्याचे प्रेम आहे. त्यामुळे त्याची अर्धी मालमत्ता दुस-या पत्नीला आणि उर्वरित अर्धी मालमत्ता जॅकीला दिली जाईल. भविष्यात जॅकीला आपल्या मालमत्तेचा वारसा मिळेल.

भारतीय संस्कृतीच्या एकत्रित कुटुंब पद्धतीच्या नावाने कितीही गोड दावे केले जात असले तरी भारतातील काही देवभोळ्या घरातील वास्तवही वेगळे आहे. देवाची पूजा करणारे आई-वडिलांना सांभाळतील असेच काहीही नाही. आपणही असेच सगळीकडे पाहतो. मात्र, अशावेळी आई-वडील मुलाच्या चुकांवर आणखी पांघरून घालतात. मात्र, एका शेतकऱ्यांने पोराला हिसका दाखवला आहे. त्यामुळे आपणही आई-वडील आणि सासू-सासरे यांचा सांभाळ करा. नाहीतर आपल्यावरही अशी वेळ येऊ शकते.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here