मुंबई :
ईकॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असणार्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला मोठा झटका बसला आहे. एफडीए म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला दणका दिला आहे. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, पानमसाला व सुंगधी सुपारी यांच्या विक्रीला बंदी आहे. तरीही हे पदार्थ सर्रास या वेबसाइटवर विकले जात होते. या प्रकारची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने या कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
२००६च्या कलम ५९ अंतर्गत फौजदारी कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधित अन्नपदार्थांची जाहिरात केल्याप्रकरणी कलम ५३ अंतर्गत दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे.
रजनीगंधा पानमसाला, बबलू गोल्ड सुंगधी सुपारी, हॅपी लाइफ पानमसाला, अशोका मसाला सुपारी, केसरी तुकडा, बिईंग मारवारी सुंगधी सुपारी, रसिली सुंगधी सुपारी, फ्रेशो काटर्झ सुंगधी सुपारी हे विकले जात असल्याचे समोर आले आहे.
काय होऊ शकते शिक्षा :-
कलम ५९ अंतर्गत सहा वर्षांची शिक्षा व पाच लाख रुपये दंड, तर कलम ५३ अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. सध्या तरी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून अन्य ई-कॉमर्स कंपन्यांनाही या कारवाईद्वारे थेट इशारा देण्यात आला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे भाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक