मोदी सरकारची 2378760000000 रुपयांची कर्जमाफी; पहा त्यातून आपल्याला किती मिळाले असते पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पुन्हा एकदा कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा आकडा प्रसिद्ध केला आहे.

ट्विटरवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने मागील वर्षभरात तब्बल 2378760000000 इतक्या रुपयांची कर्जमाफी दिली आहे. हा आकडा सामान्य माणसाच्या वाचनाच्या आवाक्यात नसल्याचे दाखवताना त्यांनी त्यावर एकदम जितके पाहिजे तितके शून्य देऊन देशाचे लक्ष वेधले आहे.

Rahul Gandhi on Twitter: “2378760000000 रुपय का क़र्ज़ इस साल मोदी सरकार ने कुछ उद्योगपतियों का माफ़ किया। इस राशि से कोविड के मुश्किल समय में 11 करोड़ परिवारों को 20-20 हज़ार रुपय दिए जा सकते थे। मोदी जी के विकास की असलियत!” / Twitter

तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, जर हीच रक्कम कोविड 19 च्या संकटाच्या काळात देशातील 11  कोटी कुटुंबियांना दिले असते. तर, एका कुटुंबाला तब्बल 20 हजार हातात पडले असते.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here