पोटार्थी मंडळीहो, ‘या’ आहेत भारतीयांच्या आवडीच्या वस्तू; पहा कोणता पदार्थ आहे टॉपर्स

जगभरातील खवय्यांना भारतीय पदार्थांची गोडी लागलेली आहे. त्याचवेळी भारतीय मंडळीही चवदार खाण्यात काही मागे नाहीत. अशावेळी आज आपण पाहणार आहोत की भारतीयांच्या आवडीचा नेमका कोणता पदार्थ ऑर्डर मागविण्याच्या यादीत टॉपवर आहे.

तर, पोटार्थी मंडळीहो, या यादीत पहिला क्रमांत पटकावला आहे अर्थातच बिर्याणी वाणाच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या घटकाने. एकेकाळी बिर्याणी हे श्रीमंत मंडळींचे खाद्य होते. मात्र, आता भारतात घरोघरी बिर्याणीचे वेगवेगळे भन्नाट प्रकार बनवले जातात किंवा ऑनलाईन ऑर्डर मागवून खाल्ले जातात. हॉटेलमध्येही या बिर्याणीला मोठी मागणी असते.

ऑनलाइन फूड डिलिव्हरीची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः तरुण त्याचा वापर करतात. अनेक ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मही तयार आहेत. आता स्विगीने भारतीयांच्या आवडीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या अहवालानुसार देशात दर मिनिटाला ९५ बिर्याणीचे आदेश देण्यात आले होते. सलग तिसऱ्या वर्षी बिर्याणीने पहिला क्रमांक पटकावला. लोकांना चिकन बिर्याणी आवडली आहे. अहवालानुसार, दर सेकंदाला १.६ बिर्याणी मागवण्यात आली होती.

मिठाईमध्ये गुलाब जामून आघाडीवर आहे. यासह फालुदा, मूग डाळ हलवा, खिचडीचीही धूम आहे. वर्षभरात खिचडीच्या ऑनलाइन ऑर्डरमध्ये १२८ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे ते पिझ्झा खाणारेही वाढत आहेत. शाकाहारी मंडळी पिझ्झा खाण्यासाठी आग्रही आहेत. पनीर, चीज, कांदा, मशरूम, कॅप्सिकम आणि मका याद्वारे बनवलेला पिझ्झा जास्त आवडीचा आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here