‘त्या’ गोष्टीचा बसला झटका; ‘या’ भाजपशासित राज्यातील निवडणुकांत भाजपचा सुपडासाफ

दिल्ली :

सध्या भाजप हा बेभरवशाचा पक्षा असल्याची भावना सगळीकडे पसरत आहे. सरकारी मालमत्ता विक्री, ढासळती अर्थव्यवस्था, मित्रपक्षांसोबत राजकारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी आंदोलनाचा चालवलेला खेळ याचा फटका भाजपला बसत आहे. आता एका भाजपशासित राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा सुपडासाफ झाल्याचे समोर आले आहे.

शेतकरी आंदोलन आणि हरियाणाचे मुख्यमंत्री यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचा जोरदार फटका हरियाणा या भाजपशासित राज्यात भाजपला बसला आहे. येथे निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. तिन्ही ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. हिसारच्या उकलाना, रोहतकच्या सांपला आणि रेवाडीच्या धारुहेडामध्ये अपक्षांनी बाजी मारली आहे.

या उटपटांग निर्णयामुळे भाजपला दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका भाजपाला गमवाव्या लागल्या आहेत. आताही भाजपने सावध भूमिका घेत शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांशी जुळवून घेतले पाहिजे अन्यथा देशभरात भाजपची अशीच परिस्थिती होऊ शकते.

भाजपकडून सातत्याने शेतकरी आंदोलनाला उधळून टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांच्या संघटना फोडण्याचाही प्रयत्न केला. अनेक प्रयत्न करूनही आंदोलकांची कोंडी न फोडता आल्याने भाजपने आंदोलकांवर विविध आरोप केले. त्याचाच फटका आता त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात बसला आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here