लस घेऊन बोंबलत फिरण्याचा बेत करताय; वाचा मग ही महत्वाची बातमी

लस घेतली म्हणजे कुठेही बोंबलत फिरायला आपण मोकळे असू, असे आपणास वाटत असल्यास ही महत्वाची बातमी वाचा. कारण, लस घेतली म्हणजे आपल्याला करोना होणार नाही असे काहीही नाही. यापूर्वी भारतात असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. तर अमेरिकेच्या एका नामांकित कंपनीच्या लसद्वारेही करोना 100 टक्के रोखला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे फायझरची कोरोना विषाणूची लस घेतल्यावर एका आठवड्यानंतर पुन्हा करोना झाल्याची केस घडली आहे. हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या मॅथ्यू डब्ल्यू यांच्याबाबत ही घटना घडली आहे. लस दिल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे आरोग्य सेविकेने सांगितले होते.

सहा दिवसांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कोविड 19 युनिटमध्ये काम केल्यानंतर ही आरोग्य कर्मचारी आजारी पडली. ताप आणि थंडी जाणवू लागली आणि नंतर शरीरात वेदना होऊ लागल्या. थकवा जाणवू लागला. ख्रिसमसनंतर नर्सने हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.

अमेरिकी संसर्गजन्य रोग तज्ज्ञ रेमर्स यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूपासून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी १० ते १४ दिवस लागू शकतात. कोरोना विषाणूंच्या लसीचा पहिला डोस तुम्हाला सुमारे ५० टक्के संरक्षण देतो आणि तुम्हाला ९५ टक्के सुरक्षेसाठी आणखी एका डोसची गरज आहे. यापूर्वी अमेरिकेत कोरोना विषाणूंचे विक्रमी रुग्ण झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाने फायझरच्या कोरोना लसीला मंजुरी दिली होती.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here