धक्कादायक : शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले ‘ते’ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यालाही…

मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. यावेळी आलेला कोरोना हा अधिक घटक असल्याचे सांगितले जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.  राज्याचे कृषीमंत्री व शिवसेना नेते दादा भुसे यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहेत. मागच्या महिन्यात 19 तारखेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती.  उपचार घेऊन त्यातून बाहेर पडल्यावर आता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तोंडावर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहे.

कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला दादा भुसे यांनी दिला आहे. तर सध्या त्यांची प्रकृती ठीक असून लवकरच ते बरे होऊन कामावर रुजू होतील असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here