निवडणूक अपडेट : मोदींच्या भाजपला शेतकऱ्यांचा झटका; पहा कुठे हा पक्ष जातोय बॅकफूटवर

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातून संवादाद्वारे तोडगा काढण्याचे सोडून सत्ताधारी भाजप सरकारने आंदोलकांना बदनाम करण्याचा डाव आखला आहे. त्याचाच फटका आता निवडणुकीच्या रिंगणात या पक्षाला बसण्यास सुरुवात झालेली आहे.

हरियाणा या भाजपशासित राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया चालू आहे. अशा निवडणुकीत मतदार शक्यतो राज्यातील सत्ताधाऱ्यांना कौल देतात. मात्र, शेतकरी आंदोलनाच्या बदनामीचा झटका देताना अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप बॅकफूटवर जात आहे. त्याचा आपसूकच फायदा काँग्रेस, इतर पक्ष आणि अपक्षांना मिळत असल्याचे निकालाद्वारे स्पष्ट दिसत आहे.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान हरियाणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल सुरू झाले आहेत. या निकालांमुळे हरियाणा सरकारसाठी मोठा धक्का ठरत आहे. परिणामी, हरियाणातील भाजप-जेजेपी सरकारच्या संतापाची शेतकऱ्यांना स्पष्ट जाणीव आहे. अंबाला येथील सार्वजनिक चेतना पक्षाचे उमेदवार पुढे आहेत. यावेळी महापौर ही थेट मतदानासाठी हरियाणाची पहिली निवडणूक आहे.

हरियाणातील सोनिपत, पंचकुला आणि अंबाला नगर निगमसह रेवाडी नगर परिषद, संपला, धारूरआणि उकाणा नगरपालिकेसाठी 27 डिसेंबर रोजी मतदान झाले. महिनाभराहून अधिक काळ शेतकरी आंदोलनाचा हरियाणाच्या राजकारणावर परिणाम झाला आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची सहावी फेरी आज होणार आहे. हरियाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here