मुंबई :
मोबाइल क्षेत्रात मोठी स्पर्धा लागलेली आहे. भर लॉकडाउनच्या काळातही मोबाइल सेक्टरला कुठलाच मोठा फटका बसलेला नाही. वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करत नेहमीच मोबाइल मार्केटमध्ये काहीतरी हटके आणण्याचा प्रयत्न मोबाइल कंपन्या करत असतात. सॅमसंग, लावा आणि इंन्फीनिक्स या कंपन्यांनी स्वस्तात मस्त मोबाइल मार्केटमध्ये आणले होते.
नवीन वर्षात स्मार्टफोन मेकर कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. परंतु २०२० मध्ये या कंपन्यांनी स्वस्तातील फोन लाँच केलेले आहेत. विशेष म्हणजे या मोबाइलने हे वर्ष गाजवले.
जाणून घेवूयात मोबाइल आणि त्याच्या फीचर्सविषयी :-
- सॅमसंग गॅलेक्सी M01 कोर :- ५ हजार ४९० रुपये
- १ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज
- ५.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
- 3000mAh बॅटरी
- ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- मीडियाटेक MT6739WW क्वॉड कोर प्रोसेसर
2) लावा Z61 प्रो :- ५ हजार ७७७ रुपये
- ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
- २ जीबी रॅम प्लस १६ जीबी इंटरनल स्टोरेज
- एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा
- 3100mAh बॅटरी
- Unisoc ऑक्टा-कोर प्रोसेसर
3) इंन्फीनिक्स स्मार्ट HD 2021 :- ५ हजार ९९९ रुपये
- २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज
- ६.१ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
- 5000mAh बॅटरी
- एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- मीडियाटेक हीलियो A20 प्रोसेसर
संपादन : स्वप्नील पवार
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
- आले की अच्छे दिन; प्रत्येकाला मिळणार 1 लाख रुपये, पहा कोणी घेतलाय जनहिताचा निर्णय
- भाजीपाला मार्केट अपडेट : एकाच क्लिकवर पहा पालक, शेपू, कोथिंबीर, मेथीसह पातीचे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा सोलापूर, पारनेरला किती भाव खातोय कांदा
- मुंबई बाजारभाव : पहा एकाच क्लिकवर संपूर्ण पिकांचे मार्केट अपडेट