सावधान… ब्रिटनहून भारतात परतलेल्या 20 जणांना कोरोनाची बाधा; 8 जण आहेत ‘या’ शहरातील

दिल्ली :

सध्या ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाचा सगळ्यांनी धसका घेतला आहे. सर्व काही सुरळीत चालू झाले असले तरीही अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ब्रिटनमधून येणारी सर्व विमाने थांबवण्यात आलेली आहेत.  B.1.1.7 असे या विषाणूचे नाव असून तो जास्तच घातक असल्याचे समजत आहेत. आता ब्रिटनमधून राज्यात आणि देशात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 जणांपैकी 8 जण हे दिल्लीमधील आहेत. ब्रिटनहून भारतात आलेल्या अनेक लोकांचा अद्याप पत्ता नाही. महाराष्ट्रातही पोलिसांनी आवाहन करून सुद्धा अनेक लोक प्रशासनासमोर आलेले नाहीत. हेच लोक जास्त धोकादायक ठरू शकतात. देशभरातून गेल्या महिनाभरात 30 हजार पेक्षा जास्त जण ब्रिटनमधून भारतामध्ये परतले आहेत. या सर्वांची सध्या चाचणी करण्यात येत आहे. यामधील 100 पेक्षा जास्त जणांमध्ये कोव्हिड-19 (Covid-19) ची लक्षणं आढळली आहेत. या सर्वांना सध्या विलिगिकरणात (Isolation) ठेवण्यात आले असून त्यांच्यात प्रकृतीकडे आरोग्य यंत्रणांचं लक्ष आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here