देशातील सर्वात मोठी गेम स्पर्धा: तुम्हालाही आहे गेम खेळायचा शौक; जिंकू शकता तब्बल 12.5 लाख रुपये

मुंबई :

ऑनलाइन गेमिंगचा शौक असेल तर तुम्हालाही 12.5 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. आरआईएलची डिजिटल आर्म रिलायन्स जिओ आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक चिप निर्माता मीडियाटेक या स्पर्धेचे आयोजन करत आहे. तब्बल 70 दिवस ही स्पर्धा भरणार आहे. ‘गेमिंग मास्टर्स’ असे या स्पर्धेचे नाव असणार आहे.

जिओ गेम्सच्या व्यासपीठावर हा गेम आयोजित केला जाईल आणि संपूर्ण स्पर्धा जिओ टीव्ही एचडी ईस्पोर्ट चॅनेल आणि यूट्यूबवर थेट प्रसारित केली जाईल. जिओ आणि मीडियाटेक यांनी सांगितले की, हा ईस्पोर्ट्स प्रोग्राम भारतातील ऑनलाइन गेमिंगसाठी सतत उत्साही असणार्‍या लोकांसाठी आयोजित केला जात आहे.

मीडियाटेकची भागीदारी असलेला जिओ यावेळी गेमरसाठी उत्तम संधी आणत आहे. यात भाग घेणा्यांना पारितोषिक म्हणून 12.5 लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी आहे. काही दिवसांपूर्वी जिओ गेम्सच्या वतीने ‘गेमिंग चॅम्पियन ऑफ इंडिया’ हा पहिला ऑनलाईन गेमिंग प्रोग्राम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता.

असे करा रजिस्ट्रेशन :-

  • या गेममध्ये कुणीही सहभाग घेऊ शकतो.
  • सर्व जिओ आणि नॉन-जियो वापरकर्त्यांसाठी नोंदणी उघडली गेली आहे.
  • रजिस्ट्रेशनसाठी गेमर्सला https://play.jiogames.com/esport या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • गेमिंग मास्टर्समध्ये नोंदणीसाठी गेंमर्सला कुठलीच पार्टिसिपेशन फी भरावी लागणार नाही.
  • याविषयी अधिक माहितीसाठी आपण https://i.ediak.com/free-fire-gaming-master-Jioesport वर देखील भेट देऊ शकता.

लक्षात घ्या या तारख्या :-

  • रजिस्ट्रेशन प्रोसेस 29 डिसेंबर 2020
  • 9 जनवरी 2021 पर्यंत करू शकता रजिस्ट्रेशन
  • 13 जनवरी 2021ला टूर्नामेंट सुरू होईल.
  • 7 मार्च 2021 ला हे टूर्नामेंट संपेल.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here