‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : 6 हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती, ‘असा’ भरा अर्ज

मुंबई :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना आपल्याला सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

कर्मचारी भरती आयोगाच्या (Staff Selection Commission) CGL च्या विविध भरती परीक्षांच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आपली वेबसाईट ssc.nic.in वर यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे.

या आहेत महत्वाच्या तारखा :-

  1. 31 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
  2. 2 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन फी भरता येईल
  3. ऑफलाईन चलान 4 फेब्रुवारीपर्यंत जनरेट करता येणार असून याची रक्कम 6 फेब्रुवारी 2021 पर्यंत देता येईल.  
  4. टायर-1 परीक्षा 29 मे 2021 ते 7 जून 2021 पर्यंत होणार आहे.

फॉर्म भरण्याआधी अर्जदारांनी पात्रतेच्या अटी चेक करा. अर्ज नियमांमध्ये बसत नसल्यास पात्रता रद्द होईल.

  1. सर्चबॉक्समध्ये SSC टाईप करून कमिशनच्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.
  2. होम पेजवर अप्लाय या पर्यायावर क्लिक करा.
  3. CGL ची निवड करा आणि ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
  4. या लिंकवर गरजेची असलेली माहिती भरा आणि तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.
  5. एप्लिकेशन सबमिट करा आणि ऍप्लिकेशन फी भरा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here