मुंबई :
जास्त मायलेज, कमी मेंटेनन्स आणि कमी पैशात मिळणार्या कार म्हणजे मारुती सुझूकीच्या. आजही सामान्य भारतीय माणसांच्या मनावर गारुड घालणारी कंपनी म्हणून मारुती सुझूकीचं नाव तोंडी येतं. मारुती अल्टो800 नंतर सर्वाधिक खप असणारी कार म्हणजे स्विफ्टच असावी. या कारला मोठी मागणी आहे.
कंपनीनेही आजवर कारमध्ये चांगले बदल करून लोकांसमोर आणल्याने या कारची मार्केटमधील हवा अजूनच वाढली. आता भारतीयांच्या पसंतीस उतरलेली स्विफ्ट शानदार लुकसह अजून स्पोर्टी होत आपल्या भेटीला येणार आहे. या नव्या स्विफ्टच्या एडिशन या लिमिटेड असतील.
असे असतील फीचर्स :-
- कारमध्ये लो स्लंग स्टांसचा वापर केला आहे.
- कारमध्ये ऑल ब्लॅक फिनिशचा वापर केला आहे.
- ब्लॅक फिनिश ग्रिल पर्यंत वापर केल्याने या एडिशनचा लूक आणखी स्पोर्टी वाटत आहे. तसेच ब्लॅक बॉडी किटचा वापर केलाय.
- स्टँडर्ड व्हेरियंटची तुलनेत लिमिटेड एडिशन मॉडल जास्त बोल्ड आणि डायनामिक लूक सोबत येते. कारला स्पोर्टी लूक देण्यासाठी कंपनीने ऑल ब्लॅक डॉमिनेंट थीमचा वापर केला आहे.
- एअरोडायनामिक स्पॉइलर, बॉडी साइड मोल्डिंग, डोर वाहजर, ऑल ब्लॅक गार्निश ग्रिल, टेल लँम्प आणि फॉग लॅम्प दिले आहेत.
संपादन : स्वप्नील पवार
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस