बोर्ड प्रकरण : आक्रमक शिवसैनिकांचा अजून एक कारनामा; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई :

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या(ED) कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले असल्याचा प्रकार काल समोर आला होता. आज शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालयावर ईडी नोटिस संबंधित बोर्ड लावले.

शिवसैनिकांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर सोमवारी रात्री होर्डिंग लावले आहे. ‘ED येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात.’ अशा आशयाचे होर्डिंग भाजप मुख्यलायाबाहेर लावण्यात आलेत. यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना मुंबईच्याय रस्त्यांवर पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अॅक्शन मोडमध्ये आलेल्या शिवसैनिकांनी हा बेधडक कारनामा केला आहे. . शिवसैनिकाच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना भाजपसह इडीवर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, ईडी दीड महीन्यांपासून आम्हाला पत्रव्यवहार करत आहे. त्यांना जी माहीती पाहीजे होती ती आम्ही दिली आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याबाबात कोणताही संदर्भ दिला नाही तरीसुद्धा भाजपची माकडं उडी मारत आहेत. यांची ईडी बरोबर हात मिळवणी आहे का? गेल्या तीन महीन्यांपासून ईडी कार्यालयावर माझं लक्ष आहे. भाजपची तीन लोकं सतत ईडी कार्यालयात जात आहेत तेथून ते कागदपत्रे घेऊन येत आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here