‘या’ एका देशाने भारताला दिला जाहीर अन खंबीर पाठिंबा; चीन, पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी

दिल्ली :

आम्ही नेहमीच मित्र म्हणून भारतासोबत असूत,  सुरक्षेसंबंधी भारताला जेव्हा आपली गरज लागेल, तेव्हा आपण भक्कमपणे भारताच्या पाठिशी उभे राहू, असे म्हणत इस्त्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी भारताला जाहीर अन खंबीर पाठिंबा दिला. यासंबंधीची घोषणा त्यांनी 17 डिसेंबर रोजी केली. इस्त्रायलच्या या अनपेक्षित, अचानक भूमिकेमुळे ; चीन, पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली.

अद्यापही चीन- भारत संबंध निवळलेले दिसत नाही. चीन-भारत तणावात अजूनच भर पडेल, असे निर्णय दोन्ही देश घेताना दिसत आहेत. भारत जास्तच आक्रमक होताना दिसत आहे. दुसर्‍या बाजूला टुकार म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान मात्र अजूनही कुरघोड्या करत आहे. एकूणच भारतासाठी युद्धजन्य परिस्थिती असताना ‘काहीही झालं तर इस्त्रायल भारताला आपला मिलिस्ट्री सपोर्ट देत राहील,’ असं इस्त्रायलचे राजदूत रॉन मालका यांनी म्हटले.   

इस्त्रायलच्या या थेट समर्थन करणार्‍या भूमिकेमुळे चीन- पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. भारत आणि इस्त्रायल देशांमधील मैत्रिपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहिती आहेत. गेल्या 30 वर्षांमध्ये या दोन्ही देशांच्या मैत्रीने नवी उंची गाठली आहे.  महत्वाची बाब म्हणजे इस्त्रायली राजदुतांनी हे वक्तव्य अशावेळी केलं आहे. जेव्हा युनायडेट अरब अमिराती, सूदान आणि मोरक्को यांसारख्या देशांनी इराणसोबत राजनैतिक संधंब दृढ केले आहेत. त्याबरोबर येणाऱ्या काही दिवसात सौदी अरबही याबाबत निर्णय घेऊ शकतो. अशास्थितीत पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here