महान व्यक्ती म्हणून पोस्टाने तिकीटावर छापले ‘त्या’ अंडरवर्ल्ड माफीयांचे फोटो; नावे वाचून व्हाल शॉक

दिल्ली :

 टपाल तिकीट म्हटलं की त्यावर अनेक महान व्यक्ती, स्मारकं तसेच मोलाची कामगिरी करणाऱया व्यक्तींचे फोटो छापलेले दिसतात. टपाल विभागाचा मोठा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. एका योजनेअंतर्गत छापण्यात येणार्‍या तिकीटांवर महान व्यक्ती म्हणून चक्क अंडरवर्ल्ड डॉन माफियांचे फोटो पोस्टाच्या तिकिटावर छापले आहेत. टपाल विभागाच्या या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. टपाल विभागाचे हे वर्तन अशोभनीय असल्याची टीका लोकांकडून होत आहे.

टपाल विभागाने ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत प्रत्येकी पाच रुपयांची 12 तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. या तिकीटावर चक्क  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बागपत गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो छापल्याचे समोर आले. बागपत जेलमध्ये मारला गेलेला गँगस्टर मुन्ना बजरंगी याचा फोटो पाहून तर लोकही शॉक झाले.

कानपूरच्या टपाल विभागामध्ये हा प्रकार घडला. माय स्टॅम्प योजनेच्या माध्यमातून हा अनागोंदी कारभार घडला आहे.  प्रकाराची गंभीर दखल घेत पोस्ट मास्टर जनरल वीके वर्मा यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here