बाबो… महाराष्ट्रातील ‘या’ गावात लागली सरपंचपदासाठी कोट्यावधी रुपयांची बोली; आकडा वाचून फिरतील डोळे

नाशिक :

कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायत, मनपाच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. आता राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने सर्व पुढार्‍यांना स्फुरण चढले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले असताना, गल्लीपासून मुंबईपर्यंत निवडणुकीची चर्चा चालू असताना लोकशाहीला काळीमा फासणार्‍या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सरपंचपदासाठी बोली लावली गेल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील एका गावात सरपंचपदासाठी तब्बल कोट्यावधी रुपयांची बोली लागली होती.  या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात लोकशाहीची अक्षरशः हत्या झाली असल्याची प्रतिक्रिया नेटकर्‍यांनी दिली आहे.

 २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाचा लिलाव याठिकाणी  २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाचा लिलाव करण्यात आला.  लिलावाचा हा पैसा रामेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे.

१ कोटी ११ लाखांपासून सुरु झालेल्या लिलाव हा २ कोटी ५ लाखावर पोहोचला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here