बाब्बो.. ३ किलोचे लिंबू पाहिलेय का; शेतात पिकलेल्या टरबूज्या लिंबाची जगभरात चर्चा..!

लिंबू आठवले की आपल्याला किती साईजचे फळ आठवते? सुपारीपासून जास्तीतजास्त छोट्या रबरी बॉलची आठवण या प्रश्नाने आपणास झाली असेल ना? बरोबर, कारण, याच साईजच्या दरम्यानचे लिंबू आपण शक्यतो पाहतो. मात्र, हरियाणा राज्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल ३ किलोचे टरबुजाच्या साईजचे लिंबू उत्पादित झालेले आहे.

आपणास ही बातमी म्हणजे अफवा किंवा अंधश्रद्धा वाटू शकते. मात्र, या शेतकऱ्याच्या या टरबूज्या लिंबाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. कारण, आज तक वहिनीसह अनेक राष्ट्रीय माध्यमांनी या टरबूज्या लिंबाची दखल घेऊन बातमी प्रसारित केली आहे.

हे प्रकरण हरियाणातील हिसार येथील किशनगढ या गावचे आहे. शेतकऱ्याचे नाव वीरेंद्र थोरी आहे. लिंबाचा मोठा आकार शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्याच्या एका वनस्पतीत खरबूजाइतके मोठे लिंबू आहेत आणि म्हणूनच शेतकरी आणि त्याच्या शेतातील लिंबू हा चर्चेचा विषय बनला आहे.

मोठ्या आकारामुळे थोरी लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावासाठी अर्ज करणार आहेत. वनस्पतींना सेंद्रिय खत दिले आहे त्यामुळे असा मोठा आकार फळाला आलेला असेल, असे थोरी यांचे म्हणणे आहे.

आता भारतात ज्या पद्धतीने संशोधन न होता औषधी दावे केले जातात. तसाच प्रकार या टरबूज्या लिंबाबाबत सुरू झालेला आहे. या लिंबाच्या रसाचे पाणी पिल्यास अपेंडिसायटिससारखे आजार होणार नाहीत असे म्हणण्यास आता त्यांच्या गावात सुरुवात झालेली आहे.

इंडिया टाईम्स यांनी बातमीत म्हटले आहे की, असे लिंबू इस्रायलमध्ये आढळतात, पण भारतात प्रथमच असा दावा केला जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

News Links :

3 किलो का नींबू… हरियाणा के एक किसान के खेत में आकर्षण बने हैं तरबूज़ के आकार के नींबू | Gigantic Lemon In Haryana (indiatimes.com)

कुदरत का करिश्मा, तरबूज के आकार के नींबू उगा रहा हरियाणा का ये किसान – haryana farmer is growing watermelon sized lemons (punjabkesari.in)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here