आक्रमक शिवसैनिकांचा कारनामा; थेट ‘त्या’ ठिकाणी लावले BJP कार्यालयाचे बोर्ड, वाचा काय आहे प्रकरण

मुंबई :

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या(ED) कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले असल्याचा प्रकार समोर आला आहे. अॅक्शन मोडमध्ये आलेल्या शिवसैनिकांनी हा बेधडक कारनामा केला आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना भाजपसह इडीवर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, ईडी दीड महीन्यांपासून आम्हाला पत्रव्यवहार करत आहे. त्यांना जी माहीती पाहीजे होती ती आम्ही दिली आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याबाबात कोणताही संदर्भ दिला नाही तरीसुद्धा भाजपची माकडं उडी मारत आहेत. यांची ईडी बरोबर हात मिळवणी आहे का? गेल्या तीन महीन्यांपासून ईडी कार्यालयावर माझं लक्ष आहे. भाजपची तीन लोकं सतत ईडी कार्यालयात जात आहेत तेथून ते कागदपत्रे घेऊन येत आहेत.

दरम्यान पुढे बोलताना ‘तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येवून अटक करुन घेऊन जा. नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.  

त्या नोटीशीविषयक घडलेल्या व्यवहाराविषयी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, माझ्या पत्नीच्या नावावर बारा वर्षांपूर्वीचा एक व्यवहार आहे. बारा वर्षांनी सरकारला जाग आली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातलं एका शिक्षिका असलेल्या मराठी महिलेनं एक घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखाचं कर्ज घेतलं, त्यासंदर्बात ईडीला दहा वर्षांनी जाग आली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here