टेस्लाबाबत गडकरींनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; पहा इलेक्ट्रिक कारच्या काय म्हटलेय त्यांनी

इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला २०२१ च्या सुरुवातीपासून भारतात इलेक्ट्रिक कार विकण्यास सुरुवात करेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याला दुजोरा दिला आहे.

टेस्ला ही सुप्रसिद्ध उद्योगपती एलन (इलॉन) मस्क यांची कंपनी आहे. देशातील इलेक्ट्रिक कारवर भर दिला आणि अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवरही काम करत असल्याचे  सांगताना पुढील वर्षापासून टेस्ला भारतात कार्यरत होणार असल्याचे गडकरी यांनी इंडियन एक्स्प्रेस आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात म्हटले.

रविवारी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मस्क यांनी ट्विटरवर कंपनीच्या भारतासाठीच्या योजनांबद्दल ट्विट केले. याआधी ऑक्टोबरमहिन्यात टेस्लाचे मस्क यांनी भारतातील एका ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती की कंपनी २०२१ मध्ये भारतात येईल. भारतातील टेस्ला कारचे चाहते देशात या गाड्या विकण्याच्या प्रतीक्षेत आहेत. इलॉन मस्क म्हणतात की, भारतातील कार उत्पादनाला लागू असलेल्या अटीमुळे टेस्लाची भारतीय बाजारपेठेत उतरण्याची टेस्लाची योजना लांबणीवर पडली होती. आता मात्र, त्याला गती येईल.

टेस्ला जगातील सर्वात प्रसिद्ध कार उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीकडे सध्या ६५९ अब्ज डॉलरची मार्केट कॅप आहे. २०१९ च्या चौथ्या तिमाहीत टेस्लाचा महसूल ७.३८ अब्ज डॉलर होता. २०२० मध्ये टेस्लाची वाढ होत आहे. अलीकडेच कंपनीला एस अॅण्ड पी ५०० निर्देशांकात स्थान मिळाले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here