सामाजिक-राजकीय विश्लेषक आणि अभ्यासू भाष्यकार म्हणून विश्वंभर चौधरी यांची ओळख आहे. चांगल्याला चांगले आणि चुकीला चूक म्हणण्याचा त्यांचा परखड स्वभाव आहे. आताही त्यांनी बंगाली प्रदेशातील निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लुकबाबत चर्चा सुरू असताना काही मुद्दे मांडले आहेत. ‘कृषीरंग’च्या वाचकांसाठी त्यांच्या फेसबुक पेजवरील हे विचार तसेच्या तसेच प्रसिद्ध करीत आहोत.
त्यांनी लिहिले आहे की,
मोदी त्या भाबड्या जनतेला अॅड्रेस करत आहेत ज्या जनतेला देशाचा पंतप्रधान आमच्या बंगाली गुरूदेव टागोरांना किती मानतो अशी भाबडी अस्मिता जपायची आहे. बाकी टागोर ना जनतेला कळले, ना मोदींना.
उदाहरणार्थ टागोरांना राष्ट्रवादच मान्य नव्हता, borderless world हे टागोरांनी पाहिलेलं स्वप्न होतं, उलट मोदींचा राजकीय डोलारा पाकिस्तान आणि मुस्लीम विरोधी हिंदू राष्ट्रवादावरच तर उभा आहे!
बाकी नक्कल तर पोषाखाचीच होऊ शकते. विचारांची होऊच शकत नाही म्हणून टागोर हे टागोरच आहेत, जगभरातील देशांच्या सीमाच पुसल्या गेल्या पाहिजेत या उदात्त विचाराचे भारतीय उद्गाते म्हणजे टागोर.
काॅपी सोप्याच गोष्टींची होणार कारण एवढा उदात्त विचार काॅपी करणं तर सोडाच, काॅपी करण्याचा प्रयत्न करणं ही मोदीजींना राजकीयदृष्ट्या परवडत नाही. म्हणून फक्त कपड्यांची काॅपी परवडणार.
म्हणजे उदाहरणार्थ बंगालचेच नाही तर संपूर्ण देशाचे अत्यंत लाडके असलेले रविंद्रनाथ टागोर एका दिवसा साठी सुद्धा संसदीय राजकारणात नव्हते! आता हे कोणाला परवडणार? मोदी जी तर अजून पंचवीस वर्ष पंतप्रधान राहण्याचा मनसुबा बाळगतात.
किंवा उदाहरणार्थ, मोदींच्या संघ परिवाराला रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत मनापासून कधीच मान्य नव्हतं, नाही! त्याऐवजी त्यांना ‘वंदे मातरम’ हेच राष्ट्रगीत आहे हे म्हणायचं आणि मानायचं दोन्ही आहे!
किंवा उदाहरणार्थ शांतिनिकेतनची शिक्षण-दृष्टी सोडा, तिथला सिलॅबस तरी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याला परवडणार आहे का?
म्हणजे असं आहे की गांधी आणि पटेलांची अहिंसा मान्य नाही पण परदेशात गांधींची पुण्याई आणि गुजरातेत पटेलांचा पुतळा पाहिजे आहे. टागोरांचा विचार मान्य नाही पण पोषाख पाहिजे आहे.
तयारी करण्यात मात्र पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही. प. बंगाल निवडणूकीच्या तयारीत त्यांनी इतर राजकीय पक्षांना तर सोडाच, खुद्द निवडणूक आयोगालाही मागे टाकलं. आयोगानं मतपेट्यांची ऑर्डरही देण्याआधी टागोर स्टाईल दाढी आणि टागोर स्टाईल पेहराव तयार होता. इलेक्शन मॅनेजमेंट जबरदस्तच आहे.
फेसबुकवर टीकेची झोड उठेल, ती ही मोदींसाठी मदतीचीच ठरणार आहे. एकदा या चर्चा सुरू झाल्या की लोक पक्षांना त्यांचा जाहीरनामा वगैरे विचारत नाहीत.
भारतीय राजकारण हा अस्मिता गोंजारण्याचा खेळ आहे. या खेळात सगळ्या प्रकारची सोंगं वठवावी लागतात. सध्या या खेळात मोदींना राष्ट्रीय स्पर्धक नाही.
सोर्स : फेसबुक
- राज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल
- आता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा
- आता घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन
- ‘या’ जगप्रसिद्ध कंपनीची भारतात होणार एंट्री; 5 राज्यात मैन्युफैक्चरिंग प्लांटसाठी चर्चा
- ‘करामती बल्ब’ असल्याचे सांगत ठगांनी दिल्लीतील व्यापार्याला 9 लाखाला घातला गंडा; ‘असा’ घडला प्रकार