भारतात ‘त्या’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही आहे मोदींचीच हवा; बॉलीवूडमध्ये सोनू सुद आहे टॉपला, राहुल गांधी आहेत ‘त्या’ स्थानावर

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सर्वाधिक सहभाग आहे. नोव्हेंबर महिन्यात ट्विटरच्या एकूणच ट्विटर एंगेजमेंट रँकिंगच्या विश्लेषक व्यासपीठावरून हे समोर आले आहे. या क्रमवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवर 7665669 ट्विटर इंगेजमेंट सर्वाधिक आहेत. मोदी प्रथम क्रमांकावर आहेत.

नोव्हेंबर 2020 मध्ये ट्विटरच्या एकूण भारतीय ट्विटर इंगेजमेंटच्या क्रमवारीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर होते तर 2737798 ट्विटर इंगेजमेंट्ससह दुसर्‍या क्रमांकावर गृहमंत्री अमित शाह, 2669604 ट्विटर इंगेजमेंट्ससह तिसर्‍या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि चौथ्या क्रमांकावर2508571 ट्विटर एंगेजमेंट्सवर पत्रकार दीपक चौरसिया होते.

राजकीय रंकिंगमध्ये चौथ्या स्थानावर राहुल गांधी आहेत. बॉलीवुडमध्ये अव्वल स्थानी सोनू सुद तर त्या खालोखाल अनुपम खेर, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आहेत. खान मंडळी यात कुठेच नाहीत.

1. राजनीतिज्ञ: नरेन्द्र मोदी- 7665669 ट्विटर इंगेजमेंट्स
2. बॉलीवुड स्टार्स: सोनू सूद- 1384353 ट्विटर इंगेजमेंट्स
3. बिजनेस हेड्स: आनंद महिन्द्रा- 400105 ट्विटर इंगेजमेंट्स
4. क्रिकेटर: विराट कोहली- 1776838 ट्विटर इंगेजमेंट्स
5. स्पोर्ट्स स्टार (नॉन क्रिकेट): विजेंदर सिंह- 353231 ट्विटर इंगेजमेंट्स
6. टीवी स्टार: सिद्दार्थ शुक्ला- 340036 ट्विटर इंगेजमेंट्स
7. जर्नलिस्ट्स: दीपक चौरसिया- 2508471 ट्विटर इंगेजमेंट्स
8. फाउंडर्स: कुणाल शाह- 72355 ट्विटर इंगेजमेंट्स
9. कॉमेडियन्स: कुणाल कामरा- 1853563 ट्विटर इंगेजमेंट्स
10. रीजनल सिनेमा स्टार्स: महेश बाबू- 914669 ट्विटर इंगेजमेंट्स

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here