आता घरबसल्या अपडेट करा आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख, पत्ता; ‘असे’ करा अपडेट

दिल्ली :

आधार कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. आधार सेवांशी संबंधित असलेल्या प्राधिकरण यूआयडीएआयने पुन्हा नागरिकांना घरी माहिती अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे आता आधार कार्ड धारक ऑनलाइन यूआयडीएआय वेबसाइटद्वारे आधारमधील त्यांचे नाव, पत्ता, जन्म तारीख आणि लिंग अपडेट करू शकतील.

यूआयडीएआय वेबसाइटवर नाव, पत्ता, जन्मतारीख आणि लिंग ऑनलाइन अपडेट करण्यासाठी आपल्याला ‘माझा आधार’ विभागात जा आणि ‘तुमचा आधार अपडेट करा’ भागातील ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाईन’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर एक नवीन पेज उघडेल. आपण इच्छित असल्यास, आपण थेट https://ssup.uidai.gov.in/ssup/ भेट देऊ शकता.

ही आहे प्रोसेस :-

  • Https://ssup.uidai.gov.in/ssup/ पोर्टलवर ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करा.
  • नव्याने उघडलेल्या पेजवर 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.
  • कॅप्चा कोड टाका आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा.
  • रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करा.
  • आता नव्याने उघडलेल्या पेजवर तुम्हाला दोन पर्याय मिळतील.
  • सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफसोबत डेमोग्राफिक डिटेल्सचे अपडेशन
  • एड्रेस वैलिडेशन लेटरच्या माध्यमातून एड्रेस अपडेट
  • दस्तऐवज पुराव्यासह नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता अपडेट करण्यासाठी एखाद्याने ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा’ वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर आपण अपडेट करू इच्छित तपशील निवडावे लागेल. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here