‘त्या’ राष्ट्रीय मुद्दयावरुन जदयूचा भाजपला ‘झटका’; नितीशकुमारही भाजपवर नाराज, बिहारमध्ये ‘त्या’ कारणामुळे भाजपला बसू शकतो मोठा धक्का

दिल्ली :

दिवसेंदिवस भाजप बेभरवशाचा पक्ष बनत चालला आहे. भाजपपासून त्यांचे अनेक जुने मित्रपक्ष दुरावले आहेत. ही सुरुवात शिवसेनेपासून झाली आणि त्यानंतर एकेक करत जवळपास 5 राज्यातील 5 मोठे मित्रपक्ष भाजपपासून दुरावले आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी भाजपने मोठे राजकारण करत बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे अरुणाचल प्रदेशमधील 6 आमदार फोडले.

त्यावेळी शांत असलेल्या जदयूचे नेते बिहार नितीश कुमारांनी आता भाजपला एका राष्ट्रीय मुद्दयावरुन दे धक्का करायला सुरुवात केली आहे. तसेच नितीशकुमार यांनी  मला मुख्यमंत्रिपद नको. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) मुख्यमंत्री कोणाला करायचं ते ठरवावं, असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी पक्षाची धुरा रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवली आहे. एकूणच नितीशकुमार घेत असलेल्या या निर्णयाचा मोठा फटका भाजपला बसणार आहे.

‘मी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं यासाठी बराच आग्रह करण्यात आला. माझ्यावर बराच दबाव होता. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मला खुर्चीचा मोह नाही,’ असंही नितीश कुमार यांनी  म्हटलं आहे. बिहारमध्ये एनडीएमधील तणाव वाढला आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये घडलेली घटना युतीत असलेल्या दोन पक्षांसाठी चांगली नाही, अशी भावना जेडीयूकडून व्यक्त करण्यात आली होती.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर जनता दल युनायटेडनं या मुद्यावर संपूर्ण देशात भाजपच्या ‘लव्ह जिहाद’ विरोधी किंवा ‘धर्मांतरविरोधी कायद्याला’ आक्रमक पद्धतीनं विरोध केलाय. यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांतील मतभेदांत वाढ होण्याची शक्यता आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here