अवघ्या 2 लाखात होणार ऑडी A4 चे बुकिंग; 5 जानेवारीला भारतात लॉंच होणार ही जबरदस्त कार, भन्नाट फीचर्स वाचून व्हाल चकित

दिल्ली :

नवीन ऑडी ए4 (Audi A4) फेसलिफ्ट 5 जानेवारी रोजी भारतात लाँच होणार आहे. डिसेंबरच्या सुरूवातीस, ऑडी इंडियाने नवीन ए 4 च्या प्रवेशाची घोषणा केली होती. कंपनीच्या औरंगाबाद असेंबली लाइनमध्ये उत्पादनही सुरू झाले आहे. डीलर्सने 2 लाख रुपयांच्या किंमतीने कारचे बुकिंगही सुरू केले आहे. ऑडी ए 4 ची एक्स शोरूम किंमत 46 लाख रुपये असू शकते.

Mercedes-Benz C-Class, BMW 3 Series,  Volvo S60, JLR Jaguar XE या गाड्यांशी ऑडी A4 टक्कर घेणार आहे. ऑडी ए 4 मध्ये 2.0 लिटर, 4-सिलेंडर, टर्बो पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. हे 190 एचपी पॉवर आणि 320Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, 7 स्पीड ट्विन क्लच डीएसजी ट्रान्समिशन स्टैंडर्ड उपलब्ध असेल.

हे आहेत फीचर्स :-

नवीन ऑडी ए 4 फेसलिफ्टमध्ये अधिक आक्रमक स्टाइलिंग असेल. ऑडीच्या नवीन एमएमआय इंटरफेससह कारच्या आत एक नवीन आणि मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम असेल. इन्फोटेनमेंट सिस्टम एपल कारप्ले (Apple CarPlay) आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करील. नवीन ए 4 मध्ये वायरलेस चार्जिंग पॅड देखील असेल. फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि लेन डिपार्चर वॉर्निंग असे अनेक सेफ्टी फीचर्सदेखील आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here