टेक्नॉलॉजी क्षेत्रातील ‘ही’ मोठी कंपनी खोलणार 1000 रिटेल पॉइंटस; कमावला ‘एवढा’ नफा

दिल्ली :

तैवानची टेक कंपनी असूस(Asus) भारतात आपले ऑफलाइन रिटेल नेटवर्क विस्तृत करणार आहे. पुढील वर्षी ती 1000 रिटेल पॉईंट वाढवनार असे कंपनीने म्हटले आहे. याचे कारण असे आहे की, ग्राहक आणि गेमिंग सेक्टरमध्ये असूसला चांगली मागणी मिळत आहे. IDCच्या माहितीनुसार सप्टेंबरच्या तिमाहीत असुसचा भारतीय पीसी विभागात 7.5 टक्के वाटा होता. सध्या कंपनीची अनेक उत्पादने ऑनलाइन चॅनेल्ससह 6000 हून अधिक रिटेल प्वॉइंट्सवर उपलब्ध आहेत.

असूस इंडिया बिझिनेस हेड, कंझ्युमर अँड गेमिंग पीसी (सिस्टम बिझिनेस ग्रुप) अर्नोल्ड स्यू यांनी सांगितले आहे की, लॉकडाउन उघडल्यापासून मागणी निरंतर वाढत आहे.वर्क फ्रॉम होम और स्टडी फ्रॉम होमचा ट्रेंड सुरूच राहिल्याने मागणी आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये असूसची विक्री मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी अधिक आहे.  गेल्या काही महिन्यांत पीसी विभागाच्या वाढीसाठी गेमिंगचा मोठा वाटा आहे, विशेषत: ऑक्टोबरच्या सणाच्या महिन्यात, असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

ऑनलाइन आणि ऑफलाइन कंपन्यांची चांगली पोहोच हे  आमच्या मजबूत कामगिरीचे एक कारण आहे. आम्हाला ही चांगली गती टिकवायची आहे, असेही पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

असूसचे भारतात 120 एक्सक्लूसिव स्टोअर्स आहेत. तसेच 5000 ट्रेडिशनल डीलरची दुकाने आहेत. एकूणच कंपनीकडे देशात 6000 हून अधिक ऑफलाइन सेल्स प्वॉइंट्स आहेत. आता कंपनी येत्या तिमाहीत अधिक 1000 रिटेल पॉईंट उघडण्याचे काम करीत आहे. या योजनेत एक्सक्लूसिव स्टोअरची संख्या 200 पर्यंत वाढविणे, दुकानांमध्ये प्रीमियम शॉपची संख्या 1100 वरून 2000 करणे आणि डीलर शॉप्सचा विस्तार करणे देखील समाविष्ट आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here