कमी झोपेचे शरीरावर होतात गंभीर परिणाम; वाचून बसेल धक्का

सध्या अनेक लोकांची झोप पूर्ण होत नाही. बदलती जीवनशैली ही आपल्या झोपेवर सुद्धा परिणामकारक ठरते. आजकाल तरूण मुलांचे रात्रीचे जागरण वाढले आहे. त्याचा परिणाम थेट शरीरावर होतो आणि वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. शरीराला जसे कष्ट गरजेचे असतात तसेच शरीराला झोप आणि आरामही गरजेचा असतो. म्हणून झोप महत्वाची आहे. जर तुमची झोप होत नसेल तर तुमच्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतील.

  1. ज्या व्यक्तींची झोप पूर्ण होत नाही त्यांना सेक्समध्येही निरसता असल्याचे आढळते.
  2. तुमच्या शरीराला आणि मेंदूला अचानक थकवा येतो आणि त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडून तुम्हाला चक्कर येणे आणि डोकेदुखी होणे या समस्या उद्भवतात.
  3. सतत भूक लागून सतत खाल्ले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम होतो तो शरीरावर. त्यामुळे वजनात वाढ होते. तसंच हे वजन आटोक्यात आणणं कठीण होतं. 
  4. झोप कमी झाल्याने शरीरामध्ये इन्शुलिनची पातळी कमी होते आणि यामुळेच मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो आणि मधुमेह झाल्याने पुन्हा झोपेची समस्या होते आणि ही चक्र चालूच राहते.
  5. स्मरणशक्तीशी निगडीत समस्या सुरू होते. त्यामुळे तुम्हाला किमान दिवसाची 8 तास तरी झोप हवी.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here