पार्थ पवारांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचे महत्वाचे विधान; वाचा, काय म्हटलेय त्यांनी

सोलापूर :

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांच्या जागी कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी दिली जाणार, असे बोलले जात आहे. दरम्यान या सर्व चर्चांवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत महत्वाची माहिती सांगितली आहे.

‘सोलापुरात एका स्थानिक वर्तमानपत्रात एक काल्पनिक राजकीय सदर छापून आल्यानंतर पार्थच्या उमेदवारीची चर्चा रंगलीय. पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा नाही’, असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

असे असले तरी आता  माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पार्थला संधी देण्याची मागणी केली आहे. तर मतदारसंघातील एका गटाने पार्थ यांना उमेदवारी देण्याचे सुचवले आहे. पार्थ यांच्यासाठी निवडणूक सोपी असेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पार्थ यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जावी आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा विचार व्हावा, असं या गटाला वाटतं. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here