‘त्या’ एका पत्रामुळे पार्थ पवारांच्या करियरला मिळू शकते कलाटणी; वाचा काय आहे विषय

पुणे :

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांच्या जागी कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी पार्थला संधी देण्याची मागणी केली आहे. अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याविषयीचे पत्र लिहिले आहे.

 पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकामं लवकर होतील. त्यामुळे पार्थ यांना संधी दिली जावी, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी लिहिलं आहे. आता हा विषय ऐरणीवर आला असून शरद पवारही याबाबत चुप्पी पाळून आहेत. त्या पोटनिवडनूकीत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना पार्थ अजित पवार यांना संधी दिली जाणार, यावर अजून राष्ट्रवादीने भाष्य करण्याचे टाळले आहे. दरम्यान पंढरपूरमध्ये कोणाला संधी मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

मात्र या एका पत्रामुळे पार्थ यांच्या उमेदवारीचा विषय पुन्हा चालू झाला आहे. दरम्यान आता भगीरथ भालके यांची पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. विशेष बाब म्हणजे ही निवड बिनविरोध झाली. आता खर्‍या भगीरथ भालके यांना चेअरमनपदी संधी दिल्याने ते जास्त अडचण करतील, असे दिसत नाही.

अमरजित पाटील यांच्या या एका पत्रामुळे सुरू झालेला विषय एका मोठ्या निर्णयावर येऊन थांबू शकतो.  पार्थ यांच्यासाठी निवडणूक सोपी असेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पार्थ यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जावी आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा विचार व्हावा, असं या गटाला वाटतं. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here