मुंबई :
सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा मुद्दा विविध अंगाने चर्चेत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरुन टीकाटिप्पणी चालू आहे. मराठा संघटना आक्रमक होत आहेत. आता अशातच इडब्लूएस आरक्षणावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. इडब्लूएसमुळे आरक्षण न मिळाल्यास अशोक चव्हाण जबाबदार असतील, असे म्हणत मराठा समाजाने गंभीर इशारा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले की, मराठा उपसमितीचा चव्हाण यांनी तातडीने राजीनामा द्यावा. वडेट्टीवार आणि भुजबळ हे समतेची शपथ विसरले, एकाच जातीसाठी त्यांचा लढा आहे. राज्यपालांकडे वडेट्टीवार आणि भुजबळ यांची तक्रार करणार असून राजीनामा न दिल्यास त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
यावेळी श्रीमंत कोकाटे यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ‘सर्वेच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ज्या ईडब्लूएस आरक्षणाची मागणी केलेलीच नव्हती ते आरक्षण देऊन महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. पाठीत खंजीर खुपसला आहे’, असा आरोप त्यांनी केला.
- संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- ‘या’ बँकेचा ग्राहकांना अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून नाही काढता येणार ‘या’ ATM मधून पैसे
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- ‘त्या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर: अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय टीव्ही; स्मार्टफोनवरही 40% डिस्काउंट
- मोठी बातमी : पशूसंवर्धन मंत्र्याचे आव्हान; बर्ड फ्लूमुळे कोणी व्यक्ती दगावल्याचे दाखवून द्या आणि…
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते