धक्कादायक : ब्रिटनहून आलेले ‘इतके’ प्रवासी आढळले पॉझिटिव्ह; भीतीने उडाली खळबळ

मुंबई :

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती सापडल्याने तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. जगभरात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पसरताना दिसतोय. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांच्या चाचणीत तब्बल १६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सध्या ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाचा सगळ्यांनी धसका घेतला आहे. सर्व काही सुरळीत चालू झाले असले तरीही अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आता ब्रिटनमधून राज्यात आणि देशात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

राज्यात काल१,५२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यानुसार राज्यात आजपर्यंत एकूण १८,०७,८२४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.३४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या करोनाचे एकूण ५८,०९१ जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here