बाबो… ‘या’ 8 शेअरने लोकांना केले ‘एवढे’ मालामाल; एकाच वर्षात दिले तब्बल 177% टक्क्यांपर्यंत रिटर्न्स

मुंबई :

शेअर बाजारात या वर्षात सर्वार्थाने अनेक विक्रम झाले. यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांचीही उच्चांकी पातळी दिसली. सेन्सेक्स आणि निफ्टी नोव्हेंबरमध्ये दुप्पट अंकात वाढले. 

1)  या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट शेअर्स बद्दल बोलायचे झाल्यास यात प्रथम क्रमांकावर टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications) आहे. ज्याने एका वर्षात 177 टक्के परतावा दिला. वर्षभरापूर्वी शेअर्सची किंमत सुमारे 385 रुपये होती, जी आज जवळपास 1070 रुपये आहे.

2)  दुसर्‍या क्रमांकावर आहे डिव्हिस लॅब(Divis Lab). वर्षभरापूर्वी हा शेअर जवळपास 1806 रुपयांना होता. आता तो जवळपास 3750 रुपये झाला आहे. म्हणजेच या शेअरमधून सुमारे 107 टक्के परतावा मिळाला आहे.

3)  एल अँड टी इन्फोटेक  (L&T Infotech) तिसर्‍या क्रमांकावर आहे.या शेअरने 106 % परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी 1750 रुपयांना असणारा हा शेअर आता 3625 वर पोहोचला आहे.

4)  पुढचा शेअर आहे मिंडट्री लिमिटेडचा (Mindtree Ltd), ज्याने सुमारे 105 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी, शेअर किंमत 775 रुपये होती, जी आज जवळपास 1595 रुपयांवर पोहोचली आहे.

5)  या यादीत पाचव्या क्रमांकावर अरबिंदो फार्माचा शेअर आहे, ज्याने सुमारे 94% परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 468 रुपये होती, जी आता वाढून 910 रुपये झाली आहे.

6)  दीवान हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (Dewan Hsg Fin. Corp.) हा शेअरदेखील टॉप -10 शेअर्सच्या यादीत आहे. एक वर्षापूर्वी हा शेअर 15 रुपयांच्या जवळ होता आणि आज त्याची किंमत 29 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच या शेअरने सुमारे 93% परतावा दिला आहे.

7)  या यादीत सातव्या क्रमांकावर टाटा ग्लोबल बेव्हरेज(Tata Global Beverage) आहे, ज्याने सुमारे 90% परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी हा शेअर 315 रुपये होता आणि आज त्याची किंमत 600 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणजेच सुमारे 90 टक्के परतावा मिळाला आहे.

8)  कॅडिला हेल्थकेअरने(Cadila Healthcare) एका वर्षात सुमारे 86% परतावा दिला आहे. हा शेअर एका वर्षापूर्वी साधारण 262 रुपये होता, जो आता सुमारे 490 रुपये आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here